रावेर, प्रतिनिधी | तालुक्यातील पिंप्री येथे बस स्थानकाजवळ केळीचा ट्रक उलटल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.१०) घडली आहे.
या बाबत वृत्त असे की, पिंप्री येथून केळीने भरलेला ट्रक काही मजुरांसह रावेरच्या दिशेने येत होता. अचानक ट्रक बस स्थानकाजवळ येताच तोल गेल्याने उलटला, त्यात बसलेल्या अरुण विठ्ठल बारी याचा जागीच मृत्यु झाला. मयत विट्ठल हा मध्य प्रदेशच्या बंभाळा येथील रहिवासी असून अत्यंत गरीब कुटुंबातील होता.