Home क्राईम गणेश कॉलनीत चोरट्यांचा धुमाकूळ: बंगल्यातून विद्यार्थ्यांचे लॅपटॉप आणि मोबाईलची चोरी

गणेश कॉलनीत चोरट्यांचा धुमाकूळ: बंगल्यातून विद्यार्थ्यांचे लॅपटॉप आणि मोबाईलची चोरी

0
155


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात घरफोडी आणि चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, गणेश कॉलनीसारख्या गजबजलेल्या भागात चोरट्यांनी आपला हात साफ केला आहे. एका बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरून अज्ञात चोरट्यांनी तीन महागडे लॅपटॉप आणि दोन मोबाईल असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ऋषिकेश चांगदेव धांडे (वय २७, मूळ रा. वैजापूर, जि. संभाजीनगर) हा तरूण जळगाव शहरातील गणेश कॉलनीतील ‘सर्वज्ञ’ बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर वास्तव्यास आहेत. २६ ते २७ मार्च रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सर्व विद्यार्थी झोपलेले असताना घरातून लॅपटॉप व मोबाईल असा एकुण ६५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार समोर आल्यानंतर ऋषिकेश धांडे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound