जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगव शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या एका तरूणाचे बंद घराची खिडकी तोडून आत प्रवेश करत घरातून रोख रकमेसह चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. या प्रकरणी गुरूवारी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील बिल्डिंग नंबर ४२, रूम नंबर २१ मध्ये राहणारे फिर्यादी शेख रईस शेख रशीद (वय ४०) हे २३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. बुधवारी २५ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या दरम्यान, ते घरी नसताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाची खिडकी तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून तिजोरीतील ऐवज लांबवला. यात अंदाजे ४०० रुपये किमतीच्या चांदीच्या ४ अंगठ्या आणि ५०० रुपयांच्या २० नोटा म्हणजेच १० हजारांची रोकड असा एकुण १० हजार ४०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी शेख रईस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तीन जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील पाटील हे करीत आहे.



