विधानसभा निवडणुकीसाठी जोमात कामाला लागा; उद्धव ठाकरे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज आपल्या सर्व आमदार आणि नवनिर्वाचित खासदारांची सेना भवनात बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारी या बैठकीमध्ये चर्चा झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. शिवसेना भवनात सुरू असलेली ही बैठक संपली आहे. ठाकरे गटाकडून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे.

‘विधानसभा निवडणुकीसाठी जोमात कामाला लागा’ अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी आमदार-खासदारांना दिल्या आहेत. लोसकभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आता विधानसभा निवणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू करण्यात आले आहे. मुंबईत नव्याने निवडून आलेल्या सर्व खासदारांसह आमदार आणि प्रमुख नेत्यांची बैठक उद्धव ठाकरे यांनी घेतली. या बैठकीमध्ये ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी जोमात कामाला लागा अशा सूचना दिल्या आहेत.

Protected Content