काँग्रेसचे ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाले असून याबाबतची माहिती त्यांच्या मुलाने ट्विट करून दिली आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याने गत काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

अहमद पटेल यांना ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांनी स्वत:च ट्विट करून याबाबतची माहिती दिली होती. यानंतर गत आठवड्यात त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यामुळे त्यांना मेट्रो रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतांनाच पटेल यांनी शेवटचा श्‍वास घेतला.

अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विट करुन अहमद यांच्या निधनाची माहिती दिली. आपणास कळविताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. आज २५ मे रोजी पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला, अल्लाह त्यांना जन्नत नसीब करे, असे फैजल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय होते. काँग्रेसचे चाणक्य म्हणून त्यांची ख्याती होती.

Protected Content