रावेर, प्रतिनिधी | माणूस म्हणून जन्माला आल्यावर आपल्याला जात आणि धर्म चिटकविले जातात. पण माणुसकीचा धर्म कोणीही स्विकारायला तयार नाही ही शोकांतिका आहे. मी व्यावसायिक आहे कारण काम हीच माझी जात असून काम हाच माझा धर्म असल्याचे प्रतिपादन श्रीराम उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा श्रीराम फौंडेशन अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी वाघोड येथे वृक्षारोपण कार्यक्रमात केले.
वाघोड येथील कुँवरस्वामी माजी विद्यार्थी परिषद वाघोड आणि श्रीराम फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण आणि विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विद्या मंदिर अध्यक्ष अरविंद पाठक हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष भगवान महाजन, संचालक नथ्थु महाजन, आय. एस. पाटील, पर्यवेक्षक बी. एस. मराठे, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, भारत महाजन, श्रीराम फौंडेशन सचिव दीपक नगरे, श्रीराम ऑटो मॅनेजर संतोष महाजन, निलेश महाजन, राजेंद्र मोपारी, मनोज पाठक, श्री पवार सर, संतोष महाराज आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कुँवरस्वामी माजी विद्यार्थी परिषद वाघोडचे दिलीप महाजन , प्रशांत पाटील, चेतन महाजन, विलास महाजन ,अतुल महाजन,प्रदीप पाटील, यासह बहुसंख्य माजी विद्यार्थी सर्व पदाधिकारी जि. प. मराठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदिप पाटील व सर्व शिक्षक ,यांनी कामकाज पहिले.
सुत्र संचालन नितिन माळी यांनी केले .