जामनेरात अनोळखी इसमाचा डंपरखाली चेंगरून मृत्यू

71e5e5d6 0908 4202 9dcc ba5a57f7a64c

जामनेर, प्रतिनिधी | शहराजवळील पाचोरा रोडवरील रेल्वे फाटकाच्या परिसरात अनोळखी इसमाचा डंपरच्या मागील चाकाखाली चेंगरून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर-पाचोरा रस्त्यावर आज दुपारी रेल्वे फाटकाच्या परिसरात साईक्रुपा कंन्ट्रक्शनच्या डंपर (क्रमांक एम.एच.१९/ सी.वाय.१४६६)च्या मागील चाकाखाली चेंगरून एका अनोळखी इसमाचा जागीच म्रुत्यु झाला. याबाबत जामनेर पोलिस स्टेशनमध्ये मयताची ओळख पटवण्याचे व गुन्हा नोंदण्याचे काम प्राथमिक माहिती हाती येईपर्यंत चालू होते. मयताची ओळख पटल्यावर नेमका मयत इसम कुठला आणि कोण होता, ते कळू शकेल.

Protected Content