अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते दोंडाईचा दरम्यान बसमधून प्रवास करत असताना धरणगाव येथील एका महिलेच्या पर्समधून 3 लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना 6 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजता अमळनेर शहरातील पैलाड चौकात उघडकीस आली. याप्रकरणी 8 मार्च रोजी दुपारी 2 वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिभा जिजाबराव पाटील (वय 48, रा. गारखेडा, ता. धरणगाव) या महिला 6 मार्च रोजी जळगाव ते दोंडाईचा बसमधून प्रवास करत होत्या. त्यांच्या पर्समध्ये 3 लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ठेवले होते. बस अमळनेर शहरातील पैलाड चौकातून जात असताना त्यांच्या लक्षात आले की पर्समधील दागिने चोरीला गेले आहेत. त्यांनी तत्काळ अमळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत.