दाम्पत्याला मारहाण करून महिलेचा विनयभंग

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील गडखांब गावात राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेसह तिच्या पतीला दारूच्या नशेत येवून मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चौकशी अंती अखेर अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, अमळनेर तालुक्यातील गाडखंबा गावात ३९ वर्षीय महिला ही आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता गावात राहणारा अधिकार मधुकर भिल हा दारू पिऊ आला. त्यावरून महिलेन अधिकार भिल याचा घरी जा असे सांगितले. याचा राग आल्याने अधिकार मधुकर भिल, रामेश्वर अधिकार भील, उषाबाई अधिकार भील आणि सुनिता आधार भिल सर्व रा. गडखांब ता. अमळनेर यांनी महिलेसह तिच्या पतीला शिवीगाळ करत दोघांना मारहाण केली. तर यातील अधिकार भिल आणि रामेश्वर भील यांनी महिलेचा विनयभंग करत गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडून नुकसान केले. याप्रकरणी महिलेने बुधवारी २४ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अधिकार मधुकर भिल, रामेश्वर अधिकार भील, उषाबाई अधिकार भील आणि सुनिता आधार भिल सर्व रा. गडखांब ता. अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय भोई हे करीत आहे.

Protected Content