Home Uncategorized महिलेचा विनयभंग करून पतीसह केली बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

महिलेचा विनयभंग करून पतीसह केली बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिला व तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिडित महिला ही आपल्या घराबाहेर असलेल्या शौचालयाकडे जात असताना ही घटना घडली. संशयित आरोपी आकाश भिकारी तायडे याने महिलेचा हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. इतकेच नव्हे तर त्याने महिलेचे ब्लाउज ओढून फाडून टाकले. या प्रकारानंतर पिडिता जेव्हा आरोपीच्या नातेवाईकांना जाब विचारण्यास गेली, तेव्हा इतर आरोपींनी तिला डोक्यात दगड मारून आणि केस धरून जमिनीवर लोळवून मारहाण केली.

यावेळी महिलेचा पती वाचवण्यासाठी आले असता, त्यांनाही चापटबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. “आमच्या नादी लागू नका, नाहीतर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकीही यावेळी आरोपींनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी आकाश तायडे, कुंदन तायडे, मायाबाई तायडे आणि अक्षदा तायडे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार विनोद तडवी करत आहेत.


Protected Content

Play sound