शिवीगाळ करण्याचा विचारला जाब : महिलेला दोघांकडून लाकडी काठीने मारहाण


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भोलाणे गावात शिवीगाळ करण्याचा जाब विचाराच्या कारणावरून एका महिलेला लाकडी काठीने डोक्यावर व हातावर मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. या संदर्भात सायंकाळी ७.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगीता नारायण कोळी (वय -५६ रा. भोलाणे ता.जळगाव) या महिला वास्तव्याला आहे. दरम्यान गावात राहणारा मयूर ज्ञानेश्वर कोळी याने शिवीगाळ केली होती. याचा जाब संगीता कोळी यांनी विचारला. या रागातून बुधवारी २८ मे रोजी सकाळी ११ वाजता मयूर ज्ञानेश्वर कोळी आणि पुनम मयूर कोळी दोन्ही रा. भोलाणे तालुका जळगाव यांनी लाकडी काठीने संगीता कोळी यांच्या डोक्यावर आणि हातावर मारहाण करून दुखापत केली. तसेच त्यांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. दरम्यान या घटने संदर्भात संगीताबाई कोळी यांनी जळगाव तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे मयूर ज्ञानेश्वर कोळी, पूनम मयूर कोळी दोघांवर सायंकाळी साडेसात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी हे करीत आहे.