पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी एका ४० वर्षीय महिलेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना शेतात घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जामनेर तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करते. गुरूवार ७ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता महिला शेतात सरपन जमा करत असतांना गावात राहणारा विष्णू पुनमचंद राठोड याने महिलेचे तोंड दाबून नाल्यातच अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी विष्णू पुनमचंद राठोड याच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड हे करीत आहे.