एरंडोल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथून जवळच असलेल्या उमरदे शिवारात रानडुक्करांनी शेतात अतिक्रमण केले असून मका, ज्वारी, उडीद, मूग आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रानडुक्करांचे कळप मोकाट फिरत असल्याने शेतकऱ्यांचे हाल होत असून, त्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
काही शेतकऱ्यांचे रानडुकरांकडून मक्याचे पीक आडवे करण्यात आले आहे. यावर्षी खरीप हंगाम चांगला असला तरी रानडुकरांच्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. तसेच शेतमजुरांना शेतात कामासाठी जावे लागते पण रानडुकरांच्या भीतीमुळे शेतमजूर सुद्धा मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तरी वन विभागाने रानडुकरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.