माया ममता चित्रपटाचे पोस्टर अनावरण

बोदवड, प्रतिनिधी  | येथे लेखक, निर्माता, दिग्दर्शक विशाल वाघ यांच्या माया ममता या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण खासदार रक्षाताई खडसे व माजी आमदार चैनसुख संचेती व मान्यवरांच्या हस्ते आग्रसेन भवन येथे करण्यात आले.

 

 

लेखक, निर्माता, दिग्दर्शक विशाल वाघ यांच्या माया ममता या चित्रपटात दोन्ही गीते संस्कृतीचा पत्ताच नाही भटकता आहे जनता तुम्हा दिसणार येथेच माया-ममता व दुसरे गीत चीतच लागत नाही हे दोन्ही गीते फुगे फेम गायक अण्णाभाऊ सुरवाडे व गायत्रीचौधरी यांनी गायलेले आहे. या चित्रपटात चरित्र अभिनेता शरद सुरवाडे सुनील काटे, भास्कर वराडे, गजु खोडके व बरेच कलाकार किमान छोटे-मोठे १४० पात्र या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. हे चित्रीकरण मुक्ताईनगर, पुरणार फाटा ते जामनेर, पाचोरा मुकतळ चाळीसगाव, मालेगाव या ठिकाणी करण्यात आले आहे. याचे डबिंग एडिटिंग व मिक्सिंग काही प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. या चित्रपटात मराठी चित्रपट महामंडळाचे रजिस्टर असलेले डायरेक्टर विशाल वाघ यांनी सर्व मेहनत घेतली आहे. चित्रपटाचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून रामेश्वर लोहार हे काम पाहत आहे.

 

माया ममता चित्रपटाचे पोस्टर अनावरण प्रसंगी खासदार रक्षाताई खडसे मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती, गजु खोडके, शिवसेना कार्यप्रमुख व्यापारी संघटनाचे अग्रवाल, मिठूलाल अग्रवाल, डॉ. वैष्णव, डॉ. महेंद्र शेजवळकर, सिताराम सोनवणे, एकलव्य जिल्हा संघटक टीव्ही रिपोर्टर जितेंद्र गायकवाड, मोहन बोदडे, शेख शाहरुख उपस्थित होते. यासह परिसरातून बरेच कलाप्रेमी उपस्थित होते. राजू इंगळे, युवराज तायडे, जामनेरचे कॅमेरामॅन मनोज भामरे उपस्थित होते.

Protected Content