मोदी-शहांनी केला फडणवीस यांचा गेम ? : राजकीय खेळीने सर्वच हैराण

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आधी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनणार असल्याची बाब उघड असतांना ऐनवेळी एकनाथ शिंदे यांचे आलेले नाव. . .फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी होण्यास दिलेला नकार आणि श्रेष्ठींनी उपमुख्यमंत्री बनावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्यामुळे दिल्लीतील भाजपच्या श्रेष्ठींनी फडणवीस यांचा गेम केल्याचे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. यातून त्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत.

राज्याच्या राजकारणातील आजचा दिवस हा अनेक धक्क्यांनी गाजला. फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असे समीकरण अस्तित्वात येईल असे सर्वांना वाटत होते. अगदी हे दोन्ही मान्यवर राज्यपालांना भेटले तेव्हा देखील असेच वाटत होते. मात्र राज्यपालांना भेटून आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केल्याने सर्वांना धक्का बसला. तर, याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी आपण सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगितले.

यानंतर सुमारे एका तासाने भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला. यात ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला सत्तेचा मोह नसून याचमुळे आम्ही शिंदे यांना पाठींबा दिला आहे. फडणवीस यांनी मंत्रीमंडळात राहणार नसल्याचे जाहीर केेले नसले तरी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री बनावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. यानंतर ट्विट करून त्यांनी फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनणार असल्याचे ट्विट केले.

यामुळे फडणवीस यांचा गेम मोदी, शाह यांनी केल्याचे मानले जात आहे. या माध्यमातून त्यांनी फडणवीस यांची राजकीय उंची कमी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content