फडणवीस-महाजनांसमोर नाथाभाऊ आले अन्. . .असे घडले !

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ खडसे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वैर सर्वश्रुत असतांना आज नाशिक येथे महानुभाव पंथाच्या संमेलनात हे तिन्ही नेते समोरा-समोर आले.

 

नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर भगवान श्री चक्रधर स्वामी यांचे अष्टशताब्दी जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय महानुभाव संमलन सुरू झाले. यामध्ये आज सकाळी चक्रधर स्वामींच्यां चरमाकीतस स्तनाक स्नान घालण्यात आले. दरम्यान दुपारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन आले असताना दुसरीकडे मंचावर आमदार एकनाथ खडसे देखील उपस्थित असल्याने मंचावर अगदी सन्नाटा पसरला.

 

देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे स्वागत, कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन होत असतांना एकनाथराव खडसे हे आपल्या जागेवर अगदी स्वस्थ बसून होते. या तिन्ही नेत्यांनी एकमेकांशी वार्तालाप देखील केला नाही.

 

एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद उघड आहेत. फडणवीस यांच्यामुळेच आपण भारतीय जनता पक्ष सोडला असल्याचे खडसे यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. तर स्थानिक पातळीवर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि नाथाभाऊ यांच्यात देखील विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. दोन्ही नेते एकमेकांवर अनेकदा कुरघोडी करण्याचे प्रयत्न करत असतात. यातून अनेकदा आरोप-प्रत्यारोप देखील करण्यात आलेले आहेत. यामुळे ते अनेकदा सार्वजनीक मंचावर एकमेकांशी संवाद साधत नाहीत. यातच आज फडणवीस देखील आल्यामुळे तिन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलणे देखील टाळल्याचे दिसून आले.

 

Protected Content