मुक्ताईनगर प्रतिनिधी । आजादी अमृत महोत्सव व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी केंद्रीय सुरक्षा बल (C.R.P.F.)या जवानांची भव्य सायकल रॅली काढण्यात आली असून रॅलीचे आज मुक्ताईनगरात आगमन होताच शिवसेनेतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
“तुमच्या त्याग,निष्ठा , समर्पण व देश सेवेच्या” व्रताने आम्ही सर्व भारतीय नागरिक निश्चितपणे सुरक्षित रित्या जगतोय व शांत झोपू शकतोय , आपल्या सारख्या निष्काम , निस्वार्थी जवानांच्या भरवशावर देशाची सुरक्षा अबाधित आहे व कायम राहील यात तिळमात्र शंका नाही असे गौरव व भावनोद्गार आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केंदीय सुरक्षा बल (C.R.P.F.) जवानांच्या स्वागत व सत्कार प्रसंगी कार्यक्रमात व्यक्त केले.
दरम्यान, प्रवर्तन चौकात पुष्पवृष्टी व फटाक्यांची आतिषबाजी करून रॅली चे स्वागत करण्यात आले. यानंतर संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे भव्य स्वागत व सत्कार समारंभ पार पडला. तसेच सर्व जवानांसाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था आमदार पाटील यांच्या कडून करण्यात आली होती. आमदारांनी देखील जवानांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला.
प्रसंगी केंद्रीय सीमा सुरक्षा (C.R.P.F.) बलाचे अधिकारी मुकेश कुमार, शैलेंद्र के आर, शरद सर, चेतन शिरोडकर, प्रशांत वाघ, संजय कदम, बामुला सर, रॅली कमांडर चेतन कुमार, एस एम कॉलेज चे प्राचार्य आय डी पाटील, गायकवाड सर, तालुका प्रमुख छोटू भोई, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, उप तालुका प्रमुख प्रफुल पाटील,उप तालुका प्रमुख नवनीत पाटील,युवा सेना जिल्हा प्रमुख पंकज राणे,शहर प्रमुख प्रशांत टोंगे, पंकज पांडव, सतीश नागरे, नगरसेवक राजेंद्र हिवराळे,नगरसेवक मुकेश वानखेडे, नगरसेवक पियुष महाजन, नगरसेवक निलेश शिरसाठ, नगरसेवक वसंत भलभले,गोपाळ सोनवणे, दीपक पवार, विक्रम राजपूत, निलेश मेंढे, शुभम शर्मा, संतोष माळी, मुकेश डवले, दीपक खुळे, अविनाश वाढे, गणेश भोजने, पपु मराठे, प्रशांत पाटील,रितेश सोनार आदी पदधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.