नवीन शिधावाटप दुकान मंजूरीसाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित

जळगाव प्रतिनिधी । अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील शासन निर्णयनुसार 1 ऑगस्ट, 2017 व 16 सप्टेंबर, 2021 अन्वये जळगाव जिल्ह्यात शहरी, ग्रामीण भागात अकार्यान्वित रास्तभाव दुकाने तसेच इतर कारणास्तव नवीन शिधावाटप दुकाने मंजूर करणेसाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

दरम्यान, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील शासन निर्णय 6 जुलै, 2017 व दि. 16 सप्टेंबर, 2021 अन्वये जळगाव जिल्ह्यात आजमितीस रद्द असलेली, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची, मयताचे वारस नसल्याने/वारसांने विहीत मुदतीत अर्ज सादर न केल्याने, नवीन तसेच विविध कारणांमुळे अकार्यान्वित रास्तभाव दुकानांचा जाहिरनामा प्रसिध्द करणेबाबत निर्देश दिले आहे.

नवीन रास्तभाव/ शिधावाटप दुकाने व केरोसीन परवाने मंजुर करण्याकरीता जाहिरनामा काढणे व प्रसिध्द करणे (स्थगनादेश नसल्यास) दिनांक 10 ऑक्टोबर, 2021, संस्थांना अर्ज करण्याकरीता मुदत (30 दिवस) दिनांक 10 नोव्हेंबर, 2021 पर्यंत, नवीन दुकानाकरीता प्राप्त झालेल्या अर्जाची प्राथमिक तपासणी छाननी, जागेची तपासणी व इतर अनुषंगिक कार्यवाही पुर्ण करणे (30 दिवस) दिनांक 10 डिसेंबर, 2021 पर्यंत, नवीन दुकाने मंजुर करणे (15 दिवस) दिनांक 25 डिसेंबर, 2021 पर्यंत याप्रमाणे राहील,

जिल्हा पुरवठा कार्यालयाच्यावतीने जळगाव, जामनेर, एरंडोल, धरणगाव, पारोळा, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल, रावेर, अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या तालुक्यातील नवीन रास्तभाव दुकाने मंजुरीसाठी जाहिरनामा प्रसिध्द केलेला असून जाहिरनामा संबंधित तहसिल कार्यालयाच्या नोटीस बोर्डावरही प्रसिध्द केला आहे. शासन निर्णयानुसार पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था),  नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था,  महिला स्वंयसहाय्य्ता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था या रास्तभाव/शिधावाटप दुकानसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

जिल्हाधिकारी यांचे सुचनेनुसार रास्त भाव दुकानांसाठी अर्ज सादर करणेची प्रक्रिया ऑनलाईन करणेत येत आहे. इच्छुक संस्था/गट इ. यांनी आपल्या तालुक्याच्या तहसिल कार्यालयाशी संपर्क साधुन प्रक्रियेविषयी अधिक माहिती प्राप्त करुन घ्यावी. असे जिल्हा पुरव्ठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

Protected Content