श्री.गो.से. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा पंचायत समितीचे आरोग्य विभाग व पाचोरा ग्रामीण रुग्णालय यांच्यातर्फे “जागरूक पालक सुदृढ बालक” अभियाना अंतर्गत पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूलमध्ये ० ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.

या आरोग्य शिबिरा प्रसंगी हायस्कूलचे शिक्षक पी. एम. पाटील, एस. पी. करंदे, अरुण कुमावत, विजय पाटील, रणजीत पाटील यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिबिराचे सुत्रसंचलन आर. बी. बोरसे यांनी केले. या आरोग्य शिबिरात डॉ. अर्चना पटवारी, डॉ. अभिषेक जगताप, डॉ. शितल वाघ, डॉ. लोकेश सोनवणे, डॉ. वैशाली शिरसाठ, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. शितल पेंटे, अधिपरिचारक आकाश ठाकुर, समाधान शेख, भारती साळुंखे, फार्मासिस्ट विनोद पाटील, दगडु वाघ, श्रीकांत महाजन, आरोग्य सेविका मनिषा गढरी, जिजाबाई वाडेकर, आशा स्वयंसेविका मनिषा अहिरे, वैशाली महाजन या टिमने हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली.

Protected Content