पाचोरा नगर परिषद अंतर्गत शहर पथ विक्रेता सर्वेक्षण सुरु

पाचोरा प्रतिनिधी । दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभीयान अंतर्गत शहरी पथ विक्रेता सर्वेक्षण या घटका अंतर्गत शहरातील पथ विक्रेता यांचे सर्वेक्षण सुरु करण्यात येत आहे. 

सदरचे सर्वेक्षण हे मोबाईल अॅप द्वारे करण्यात येत आहे. त्यासाठी आधार नंबरची जुळवणी मोबाईल क्रमांकशी असणे आवश्यक आहे. त्यासाठी शहर फेरीवाला तांत्रिक समितीची बैठक मुख्याधिकारी, तथा अध्यक्ष, शहर फेरीवाला तांत्रिक समिती, यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या दालनात घेण्यात आली तसेच समितीची सर्वेक्षणासाठी मंजुरी देण्यात आली व समिती च्या सदस्यांना सर्वेक्षण करणे कमी सहकार्य तथा काही सूचना असल्यास तसे आवाहण करण्यात येऊन सदरच्या बैठकीत मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासन अधिकारी प्रकाश भोसले, कर अधीक्षक दगडू मराठे, व्यवस्थापक संदीप भोसले, समुदाय संघटक नरेंद्र अहिरे, समितीचे सदस्य जितेंद्र महाजन, सलीम बागवान, रविंद्र भोई, वंदना खरे, शबनम बागवान, जमील खान, डॉ. नंदकिशोर पिंगळे, गोकुळ सोनार, वैशाली जडे, बँक अधिकरी पासवान, न.पा. लिपिक भागवत पाटील व महेंद्र गायकवाड व सर्वेक्षण करणारी संस्था प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत समितीची बैठक पार पडली.

 

 

Protected Content