महाविकास आघाडी सरकार टिकांव अशी आमची इच्छा-जयंत पाटील

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेनेत उभी फुल पडल्याने राज्यातील राजकारणात उलथापलथी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची पुढील दिशा ठरविण्यात आली असून महाविकास आघाडीचे सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठींबा आहे. महाविकास आघाडी सरकार टिकावं अशी आमची इच्छा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंती पाटील यांनी सांगितले.

 

पुढे बोलतांना जयंत पाटील यांनी सांगितले की, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार टिकांव अशी आमची इच्छठा आहे. राज्यात मविआ सरकार टिकवण्यासाठी आवश्यक ती मदत करावी असे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवले असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्याबाहेर गेलेले शिवसेना आमदार माघारी येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राजकीय बंडखोरी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. दरम्यान मुख्यमंत्री यांनी शासकीय वर्षा बंगला सोडला आहे. परंतू मुख्यमंत्री पद सोडलेले नाही अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

 

एकनाथ शिंदेंसोबत किमान मुंबईतील आमदार बाहेर जाणार नाही असा विश्वास असून लवकर शिवसेनेतील हा वाद निवळेल असा विश्वास व्यक्त त्यांनी व्यक्त केला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!