यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज ही आपल्या देशात महीलांच्या विटंबनेचे प्रकार थांबलेले नसुन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली जात आहे. समाजातुन अशा अपवृत्तीच्या नाश झाला पाहिजे व सत्य वृत्तीचे आचरण झाले पाहिजे असे प्रतिपादन आमदार एकनाथराव खडसे यांनी येथे श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळ यावल यांच्या वतीने आयोजित रावण दहनाच्या प्रसंगी व्यक्त केले.
यावल येथे श्री महर्षी व्यास महाराज यांच्या मंदीरा समोरील हरीता सरीता नदीच्या पात्रात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रावण दहनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे, डॉ. केतकीताई पाटील, प्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील, युवा नेते धनंजय शिरीष चौधरी, प्रांत अधिकारी कैलास कडलग, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,आदिवासी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष एम. बी. तडवी, पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील यांच्यासह विविध पक्षाचे व संस्थाचे पदाधिकारी मोठया संख्येत या ठिकाणी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालनआयोजक प्रा.मुकेश येवले आणी एस. ए. बाविस्कर यांनी केले.
यावेळी अमोल जावळे, डॉ. केतकीताई पाटील व श्रीराम पाटील यांनी देखील नागरिकांना विजयदशमी च्या शुभेच्छा दिल्यात. भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी आपल्या मनोगतातून राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून यावल नगरीचे दैवत असणार्या श्री व्यास मंदिराला मोठ्या प्रमाणात भरीव निधी मिळून याचे काम लवकरच सुरू होणार असल्याची महत्वाची घोषणा केली.
या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांच्यासह रावण दहन समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी यावल येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.