लंडन वृत्तसंस्था । शेवटच्या क्षणांपर्यंत रंगलेला विश्वचषकाचा अंतिम सामना टाय झाल्याने आता निर्णय सुपर ओव्हरच्या माध्यमातून होणार आहे.
आज विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतीम सामना इंग्लंड आणि न्यूझिलंड यांच्यात खेळला गेला. यात न्यूझिलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. तथापि, यजमान संघाच्या गोलंदाजांच्या अचूक गोलंदाजीने किवीजला मुक्तपणे फलंदाजी करता आली नाही. ख्रिस वोक्सने मार्टिन गप्टिलला(१९) पायचीत करत न्यूझिलंडला पहिला धक्का दिली. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसनने डाव सावरण्याची प्रयत्न केला असला तरी प्लंकेटने विल्यमसनला(३०) बाद केले. निकोल्सने एक बाजू लाऊन धरली तरी प्लंकेटने निकोल्सला ५५ धावांवर बाद केले. यानंतर टॉम लॅथमने चांगली फलंदाजी करून न्यूझिलंडला २४१ धावसंख्या करण्यासाठी मदत केली.
दरम्यान, २४२ धावांचे माफक आव्हान घेऊन उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरवात चांगली झाली नाही. न्यूझीलंडच्या गोलंदाजांची टिच्चून गोलंदाजी केल्यामुळे यजमान फलंदाजांची सावध सुरूवात केली. हेन्रीने जेसन रॉयला परत पाठविले. तर ग्रँडहोमने जो रूटला बाद केले. बेअरस्ट्रो ३६ धावा करून बाद झाला. कर्णधार मॉर्ननही लवकरच परतला. नंतर बटलर व स्टोक्सने डाव सावरला. फर्ग्युसनने बटलरला ५९ धावांवर बाद केले. तर यानंतर क्रमाक्रमाने गडी बाद होत गेले. एका बाजूने स्टोक्स टिकून असल्यामुळे इंग्लंडच्या आशा जिवंत होत्या. शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी १५ धावा आवश्यक होत्या. यातील तिसर्या चेंडूवर स्टोक्सने षटकार हाणला. यामुळे तीन चेंडूत नऊ धावांची आवश्यकता होती. यानंतर एका चेंडूवरू दोन धावा मिळाल्या. मात्र फलंदाजाला चेंडू लागून सीमापार गेला. यामुळे या सहा धावा मिळाल्या. यामुळे दोन चेंडूमध्ये तीन धावांची आवश्यकता होती. येथे एक धाव निघाली तरी आदील रशीद बाद झाला. यामुळे एका चेंडूवर दोन धावांची आवश्यकता होती. मात्र एकच धाव निघाल्याने सामना टाय झाला. यामुळे निर्णय सुपर ओव्हरवर गेला.