जळगाव जिल्हा मुलींचा फुटबॉल संघाची घोषणा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । नाशिक येथे होणाऱ्या आंतरजिल्हा महाराष्ट्र राज्य १७ वर्षाखालील मुलींचे फुटबॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलींचा फुटबॉल संघाची घोषणा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम येथे करण्यात आली.

सविस्तर माहिती अशी की, नाशिक येथील पंचवटी येथे १२ ते १८ पर्यंत आंतरजिल्हा महाराष्ट्र राज्य १७ वर्षाखालील मुलींचे फुटबॉल स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्हा मुलींचा फुटबॉल संघानेही सहभाग नोंदविला आहे. जळगाव जिल्ह्याच्या पहिला सामना १३ मे ला वाशिम जिल्हा याच्या सोबत होणार आहे. या स्पर्धेसाठी  जळगाव जिल्ह्याचा संघ मंगळवार १० मे रोजी सकाळी ११ वाजता जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारुक शेख यांनी घोषित केला.

यात कर्णधार शितल सहानी तर उपकर्णधार क्रिशा मुल्ला, रिया गोगिया,पायल कोळी, रोशैल डिसूजा, साक्षी मोरे, चैताली सोनवणे, प्रांजल देशमुख, जास्मिन चार्ल्स, तृप्ती चौधरी, अंजली शर्मा, दुर्गा विसपुते, पूजा इंधाटे, रीया ठाकुर, काजल वांद्रे, दिव्या काळे, निकिता पवार, साक्षी पाटील यांचा समावेश आहे.

याप्रसंगी उपाध्यक्ष इम्तियाज शेख, सहसचिव प्रो डॉ अनिता कोल्हे ,ताहेर शेख, मुख्य प्रशिक्षक तथा सहसचिव अब्दुल मोहसिन उपस्थित होते. या संघाचे  संघ व्यवस्थापक म्हणून भुसावलचे मोसेस चार्ल्स व प्रशिक्षक म्हणून जळगाव चे राहील शेख अहमद यांची नियुक्ति करण्यात आली.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!