बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील नागरिकांना चक्क बिबट्याच्या दहशतीमुळे पाणीपुरवठा मागील काही दिवसांपासून विलंबाने होत आहे. यावर आपला विश्वास बसणार नाही. पण मागील आठवड्यामध्ये गेरू माटरगाव येथून खामगांव शहराच्या पंपिंग हाऊस आहे. तिथे एका बिबट्याचा वास्तव्य दिसल्याने ग्रामस्थ भयभीत झाले. ते या भागामध्ये जाण्याकरता धजावत नाही आहे.
सामान्यता सरासरी आठ ते दहा दिवसानंतर खामगावकरांना नियमित पाणी मिळण्याची सवय करून घ्यावी लागली आहे. निवडणूक आल्या की 24 तास पाणी मिळणार ,मीटर द्वारे पाणी मिळणार घरोघरी पाणी मिळणार अशा मोठ्या घोषणा आजी-माजी लोकप्रतिनिधी देत आले आहे. 100 वर्षापेक्षा जास्ती जुनी पाईपलाईन अनेक वेळा नादुरुस्त झाली. तर पाणीपुरवठा हा जवळपास पंधरा दिवसापर्यंत लांबणीवर पडतो. याकरता कोणतेच ठोस पावले आतापर्यंत लोकप्रतिनिधी उचलले नाही आहे.
यापूर्वी बोलायचं झालं तर ज्यांची सत्ता राज्यात होती त्यांच्याकडे बहुतांश खामगाव नगरपरिषद ची सत्ता होती .त्यामुळे नेमकं पाणी मुरलय कुठे हे अद्याप समजायला मार्ग नाही आहे. त्यातच जेव्हा लोकप्रतिनिधी फक्त राजकारणांमध्ये व्यस्त असता तेव्हा त्यांचे जनतेकडे असलेल्या समस्यांकडे कसे दुर्लक्ष होते हे या दैनंदिन खामगावकरांच्या होत असलेल्या पाणी समस्येवरून दिसून येते.
खामगाव येथे सध्या नगरपरिषद मध्ये दोन वर्षापासून प्रशासक कारभार पाहत असले.तरी भाजपचे आकाश फुंडकर हे आमदार म्हणून इथली सत्ता उपभोगत आहे.
मागील दोन टर्म पासून ते खामगाव मतदारसंघांमध्ये आमदार म्हणून निवडून येत आहे. पण पुन्हा एकदा काही दिवसांनी लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभेमध्ये लवकरच पाणी देऊ ,स्वच्छ पाणी देऊ 24 तास पाणी देऊ याचा सपाटा त्यांनी आतापासूनच आपल्या भाषणांमध्ये लावला आहे. पण नळातून काही खामगावकरांना पाणी दहा दिवसा शिवाय येत नाही आहे. त्यामुळे आज थेट खामगाव येथील नगरपरिषद मध्ये कार्यरत असलेले पाणीपुरवठा तसेच संबंधित वन विभाग या विषयाकडे मागील काही दिवसांपासून या समस्येबाबत त्यांच्या डिजिटल अपडेटद्वारे गावाची समस्या मांडत असले तरी याची कोणी दखल घेत नसल्याने थेट या समस्याकडे आपण लक्ष द्यावे, जेणेकरून या वृत्ताने कुंभकर्ण झोपेतून प्रशासन जागी तरी होइल. एकीकडे मुबलक पाणी साठा धरणामध्ये असताना शहरातील नागरिकांना पाहण्याकरता दाही दिशा फिरावे लागत असताना सुपरवायझर ठाकूर देखील हताश झाले आहे. लवकर गेरूमांटर गावात जनजागृती करून त्यांच्या मनात बिबट्या बाबत निर्माण झालेली दहशत. यंत्रणेने दूर करून तिथला पंपापर्यंत कर्मचारी जात गावकऱ्यांच्या मदतीने पंपिंग स्टेशन नियमित सुरू राहील. जेणेकरून खामगांव ला रोटेशन पद्धतीने पाणी मिळेल अशी भावना त्यांनी लाईव्ह ट्रेंड न्यूज जवळ बोलून दाखवली.
एकंदरीत कर्मचारी फक्त आदेश देणारे किंवा आदेश पाळणारे आपण पाहिले आहे .पण गावात मुबलक पाणी असताना ते नागरिकांना का मिळत नाही याकरता .जो पाणीपुरवठातला कर्मचारी दररोज 400 ते 500 फोन कॉल अटेंड करून गावकऱ्यांचा समाधान करतो. त्यांनी आज पुन्हा एकदा शहरात नागरिकांना नियमित पाणी मिळावे याकरता आपला खारीचा वाटा उचलत असल्याचं दाखवून दिलं आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. पण ज्या लोकप्रतिनिधी संबंधित विभाग आपल्या कुंभकर्ण झोपेतून आता तरी जागी होतील का हा देखील एक मोठा प्रश्न आहे.
गेरू माटरगाव येथील बिबट्याच्या धाकामुळे पंप सुरू करण्यात बाबत रात्री १ वाजे ऐवजी सकाळी ७ वाजता सुरू होत आहे. संध्याकाळी पंप उशिरा बंद करण्या ऐवजी पंप लवकर बंद होत आहे. त्यामुळे दोन्ही टाक्या रात्री भरल्या जात नसल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बाबत कोणतीही माहिती देता येणार नाही. जसे जसे पाणी उपलब्ध होईल तसे तसे गावातील पाणी पुरवठा घेण्यात येईल.