Home Cities पारोळा शिवतीर्थ उत्सव समिती व युवा शिवप्रेमी संघटनेच्या मागणीला यश !

शिवतीर्थ उत्सव समिती व युवा शिवप्रेमी संघटनेच्या मागणीला यश !


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवतीर्थ उत्सव समितीने व युवा शिवप्रेमी संघटनेने आमदार चिमणराव पाटील यांना निवेदन देऊन शुशोभीकरण व अश्वारुढ महाराजांचा पुतळा संदर्भात मागणी केली होती. ती मागणी आज पुर्ण होत आहे. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा १८ फेब्रुवारी रोजी लोकार्पण सोहळा होत आहे. त्या बदल आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला.

निधी मंजूर झाल्याने आ. चिमणराव पाटील व अमोल पाटील यांचे जाहिर आभार युवा शिवप्रेमी संघटनेचे पदाधिकारी रवी मराठे, राजेंद्र कासार, समाधान धनगर, नितीन बारी, ज्ञानेश्वर मराठे, निलेश मराठे, मनोज चौधरी, अनिल पाटील, आकाश ठाकूर ,कल्पेश मराठे, राजू गढरी, विजय चौधरी, श्रीराम भोई, जयेश भोई, अक्षय पाटील, सौरव पाटील, दीपक भोई, ललित लोहार, योगीराज लोहार, विशाल मेटकर, रोहन कासार ,अमोल ठाकूर, राजू चौधरी, सोनू भोई, नरेंद्र कास्तव, सचिन माळी व शिवतीर्थ समिती अध्यक्ष गणेश पाटील, ईश्वर पाटील, लोकेश महाजन, संजय साळी, किरण चौधरी, मुकुंदा मिस्त्री, दिनेश चौधरी, शिवप्रेमी नी मानले.

गणेश पाटील यांनी शिवाजी पुतळा ऐवजी शिवतीर्थ हे नाव देखील यांनी दिले आहे. लोकसहभागातुन पेव्हर ब्लोक व अनेक कामे त्यांनी या आधी राबवलेली आहेत. खा.उन्मेश पाटील, नगराध्यक्ष करणं पवार यांनी प्रत्यक्ष शिवतीर्थ येथे शिवजयंती रात्री २ वाजता भेट देऊन काम करत पाहताना कौतुक केले होते. माजी पालकमंत्री सतीष पाटील, चंद्रकांत पाटील, मा नगराध्यक्ष तुषार पाटील दिपक अनुष्ठान हे देखील सहकार्य करत होते . दिवाळीचा पाहिला दिवा महाराजसाठी हि देखील संकल्पना शिवतीर्थ समीती ने राबवली आहे. अनेक शिवप्रेमी कडुन आमदार चिमणराव पाटील अमोल चिमणराव पाटील याचे कौतुक करत आहे.


Protected Content

Play sound