यावल प्रतिनिधी । येथील नगर परिषदव्दारे शहराला स्वच्छ योग्य व मुबलक पाणीपुरवठा व्हावा, या दृष्टीकोणातुन १४ व्या वित्तीय आयोगाच्या सुमारे २ कोटी८७ लाख रुपये निधी खर्चातुन नवीन जल साठवण तलावाचे काम अंतीम टप्यात आले असुन या नव्या साठवण तलावामुळे शहरातील ६० हजार लोकवस्तीतील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा नगर परिषदचे गटनेते अतुल पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
यावल शहरापासुन सुमारे दोन किलो मिटरच्या लांबीवर असलेल्या जुन्या पाणी साठवण तलावाच्या बाजुस २०० मिटर लांबी आणी५० मिटर रुंद्धी व११ मिटर उंचीचे १ooएमएलडी जलसाठवण क्षमतेच्या तलावाचे काम जवळपास अंतीम टप्यात आले असुन , यामुळे ३०० एमएलडी क्षमतेच्या जुन्या साठवण तलाव आणी १०० एमएलडी क्षमतेचे नवीन उभारण्यात येत असलेल्या साठवण तलावाचे काम साधारण मागील तिन महीन्यापुर्वी सुरू करण्यात आले होते आता हे काम ९० टक्के पुर्ण झाले असुन शहराला सद्य परिस्थितीला जुन्या साठवण तलावातुन शहराला ४५ दिवस पाणी पुरवठा करता येईल ईतकाच जलसाठा उपलब्ध रहात आहे यामुळे वारंवार भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नापासुन आता यावलच्या नागरीकांची सुटका होणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलतांना अतुल पाटील यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील अनेक शहरातील नगर परिषदेतील होणाऱ्या पाण्याच्या संकटात असतांना यावल शहरातील नगर परिषद हे नागरीकांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणारी एकमेव नगर परिषद असल्याची माहीती त्यांनी यावेळी पाटील यांनी दिली. यावेळी अतुल पाटील यांच्यासमवेत माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रा . मुकेश येवले , माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते, नगरसेवक समिर शेख ,यांच्यासह सामाजीक कार्यकर्ते गणेश महाजन, डॉ. युवराज चौधरी, दिलीप वाणी, राजु फालक, गिरीष महाजन, एजाज देशमुख यांच्यासह आदी मान्यवर मंडळी उपस्थितीत होती.