होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे प्रातांना निवेदन (व्हिडीओ)

Bhusawal1

भुसावळ प्रतिनिधी । महाराष्ट्र होमगार्ड यांच्या विविध अडचणी दुर करण्यासाठी भुसावळात आज मुक मोर्चा काढण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी यांना दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र होमगार्डच्या मागील सहा महिन्यांचे थकीत पगार तत्काळ मिळावे, १० जानेवारी २०२० प्रमाणे महाराष्ट्र होमगार्डतील ३० ते ३५ हजार होमगार्ड यांना देण्यासाठी शासनाकडे निधी नाही म्हणून सर्वांना सेवेतून करण्यात आले आहे, त्यांना त्वरीत सेवेत रुजू करावे. राज्यातील ५०/५५ वयाचे असलेले पुरुष व महिला यांना विविध कारणाने अपात्र केल्याने अपात्र केलेले आहे त्यांनी बिनशर्त परत घ्यावे. शनिवारची साप्ताहिक ही कवायत केलेली असून ती रद्द करण्यात यावी व पुर्वीप्रमाणे महिन्यातून चार रविवार साप्ताहिक कवायत चालु करण्यात यावी. या मागण्या केल्या असून याप्रकरणी अनिल पांडूजे यांनी निवेदन दिले आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/124289632214196/

Protected Content