भुसावळात रूग्णसंख्या कालच्या पेक्षा कमी; मात्र संसर्ग वाढलेलाच !

भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यात कालच्या पेक्षा कमी रूग्ण आढळून आले असले तरीही लक्षणीय प्रमाणात पेशंट आढळून आल्याचे आजच्या अहवालातून अधोरेखीत झाले आहे.

जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी दिलेल्या अहवालानुसार जळगाव आणि भुसावळ तालुक्यातील पेशंटची संख्या सर्वाधीक असल्याचे अधोरेखीत झाले आहे. यात भुसावळचा विचार केला असता गेल्या २४ तासांमध्ये तालुक्यातून ७१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तीन दिवस सातत्याने १०० पेक्षा जास्त रूग्णसंख्या आढळून आल्यानंतर आजच्या रूग्णसंख्येचा विचार केला असता तसा थोडा अल्प दिलासा मिळालेला आहे. मात्र ७१ ही रूग्णसंख्या देखील खूप जास्त असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत.

भुसावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. १० जानेवारी रोजी तालुक्यात २५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले होते. यानंतर पुढील दिवशी तब्बल चार पटीने म्हणजे १०७ पेशंट आढळून आले. यानंतर यात वाढ होऊन काल म्हणजे १२ जानेवारी रोजी १३५ रूग्णांचे निदान झाले. तर काल यात पुन्हा वाढ होऊन १३७ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यानंतर मात्र आज रूग्णसंख्या ७१ इतकी असल्याचे अहवालातून दर्शविण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content