ओमायक्रॉनला किरकोळ समजू नका : आरोग्य संघटनेचा इशारा

मुंबई, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोरोनाच्या ओमायक्रॉन आवृत्तीचे सावट सरतांना दिसत असतांना आरोग्य संघटनेने मात्र याला किरकोळ समजून बेसावध राहू नका असा इशारा दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटना जगातील सर्व देशांना कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराबद्दल वारंवार सावधगिरीचा इशारा देत आहे. याचा धोका अद्याप संपलेला नाही. डब्ल्यूएचओनं पुन्हा एकदा म्हटलं आहे की जगातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनच्या लाटेचा उच्चांक येणं बाकी आहे. त्यामुळे कोरोना निर्बंध  हळूहळू शिथिल केले पाहिजेत.   जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड-१९ वर बनलेल्या टेक्निकल लिडने हा सल्ला दिला.

ऑनलाइन ब्रीफिंगमध्ये, डब्ल्यूएचओ अधिकारी मारिया वेन म्हणाल्या की, आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत की अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या लाटेचा पीक येणं बाकी आहे. अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणाचा दर खूपच कमी आहे आणि या देशांतील असुरक्षित लोकसंख्येला कोविड-१९ लस मिळालेली नाही. त्यामुळे अशावेळी सर्व बंधनं एकाच वेळी हटवू नयेत.

मारिया वेन म्हणाल्या की, आम्ही नेहमीच सर्व देशांना कोविड-१९ निर्बंध हळूहळू शिथिल करण्याचं आवाहन केलं आहे. कारण हा विषाणू शक्तिशाली आहे. काही देशांमध्ये असा विश्वास वाढत आहे की लसीकरणाचे चांगले दर आणि ओमायक्रॉनच्या कमी प्राणघातकतेमुळे धोका टळला आहे. हा प्रकार निश्चितपणे अत्यंत सांसर्गिक आहे परंतु खूप घातक नाही, त्यामुळे अधिक घाबरण्याची गरज नाही. मात्र असा विचार करणं चुकीचं आहे. ते म्हणाले की संसर्ग वाढल्याने मृतांचा आकडाही वाढू शकतो असा इशारा देण्यात आलेला आहे.

 

 

 

 

 

Protected Content