शेतकऱ्यांना शासकीय मदतीच्या वाटपास प्रारंभ

 

मुंबई, वृत्तसंस्था । राज्यातील विविध जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे नुकसान झाले होते. अशा बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना राज्यशासनाकडून आर्थिक मदत देण्यास सुरूवात झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पूरग्रस्त भागाचा दौरा करून १० हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले होते. आज सोमवार ९ नोव्हेंबर रोजी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी २ हजार २९७ कोटी ६ लाख ३७ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत लगेच वितरीत करण्यात येईल, असे आता सांगण्यात आले आहे.

Protected Content