राममंदिरासाठी प्रत्येकाने ‘११ रूपये आणि एक विट’ द्या – मुख्यमंत्री योगी

Yogi Adityanath

नवी दिल्ली वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील भव्य राम मंदिर बांधण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने ‘११ रूपये आणि एक विट’ देण्याचे आवाहन केले आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाच्या एका भाजपा नेत्याने लोकांना मंदिर बांधण्यासाठी हातभार लावण्यास सांगितले आहे. झारखंडमधील निवडणूक सभेत ते बोलत होते.

योगी आदित्यनाथ हे भाजपा उमेदवार नागेंद्र महतो यांच्या सभेसाठी उपस्थित होते. ‘५०० वर्षांपासून सुरू असेलेला वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे सुटला. काँग्रेस, आरजेडी, सीपीआय-एमएल आणि काही अन्य पक्षांना या वाद मिटू नये असे वाटत होतं, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केला. ‘लवकरच अयोध्येत एक भव्य राम मंदिर उभं राहणार आहे. झारखंडवासीयांनी यासाठी आपल्याकडून ११ रूपये आणि एक विट द्यावी, असं आवाहन मी करत आहे, असेही ते म्हणाले. मी उत्तर प्रदेशमधून आलो आहे. जी प्रभू श्रीरामाची जन्मभूमी आहे. त्यांच्या शासन प्रणालीला रामराज्य म्हटलं जायचं. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकांना न्याय दिला. तेच कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील करत आहेत, असे योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.

Protected Content