खराब रस्त्यामुळे अपघातात मृत्यू झाल्यास मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा मनसेचा इशारा

यावल प्रतिनिधी । शहरातुन गेलेल्या अंकलेश्वर ते बुऱ्हाणपुर राज्य महामार्गाच्या रस्ता दुरूस्ती करीता तात्काळ कामाची निविदा प्रक्रीयापुर्ण करून कामास त्वरीत सुरवात करावी व तात्काळ दुरूस्त करावा जर कामास विलंब झाला व रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुदैवाने अपघातास यावल सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार धरून संबधीतांच्या विरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा ईशारा एका लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यावलच्या सा. बां. विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.

या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल शहरातुन जाणारा अंकलेश्वर ते बुऱ्हाणपुर या राज्य महामार्गाची गेल्या अनेक दिवसांपासुन अत्यंत दयानिय अवस्था झाली असून या मार्गावरील रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने वाहन चालविणे अत्यंत जिकरीचे झाले असुन दुचाकी वाहन चालकांना तर वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे . याच मार्गावर किनगाव ते यावल रस्त्यावर अनेक भिषण अपघात होवुन त्यात अनेक निष्पाप नागरीकांना आपला जिव गमवावे लागले आहे . 

अशा धोकादायक मार्गाच्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी तसेच या मार्गावर मागील दहा वर्षापासुन अनेक ठिकाणी दिशाफलक नसल्याने देखील अपघात होत असुन , यावल ते सातोद रस्त्यावर मंजुर झालेल्या रस्त्याच्या कामास नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन तात्काळ रस्ता दुरुस्ती करावा रस्ता तात्काळ दुरूस्त न केल्यास व या कालावधीत काही अपघात झाल्यास यास यावलचे सार्वजनिक बांधकाम विभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा ईशारा आणी विविध मागण्यांचे निवेदन यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाविभागीय अधिकारी जे .एस . तडवी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा जनहित जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर, विभाग अध्यक्ष आबीद कच्छी, शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, नितिन डांबरे, शहर विधार्थी सेनेचे अध्यक्ष गौरव कोळी यांच्या स्वाक्षरी आहेत .

Protected Content