राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ मराठा समाजातर्फे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांच्या जयंतीनिमित्त  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्तदान शिबिर गोरगरिबांना अन्नदान शिबिर खिचडी वाटप, फळ वाटप करण्यात आले. मराठा समाज तालुका दिनदर्शिका 2021 लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी भुसावळ रेल्वेस्टेशन जवळील अश्‍वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर स्वराज्याची ज्योत महाराजांच्या मनात पेटवणाऱ्या मा जिजाऊ यांना एडवोकेट जास्वंदी भंडारी (पाटील) यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून व दीप ओवाळून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांनीही पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी गौरव पाटील, किरण पाटील, विकास वलकर, राजेश यादव, प्रमोद पाटील, गिरीश पवार, सय्यद रफिक, शुभम शिंदे आदींनी रक्तदान केले. सदर कार्यक्रमाला मराठा समाज तालुकाध्यक्ष किरण पाटील, तालुका उपाध्यक्ष श्रीकांत परकले, नगरसेवक राजेंद्र आवटे, नगरसेवक राहुल बोरसे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, नगरसेवक ललित मराठी, ॲड. जास्वंदी  पाटील, जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष ललिता पाटील, ईश्वर पवार, कृष्णा शिंदे, योगेश जाधव, जगदीश पाटील, नाना पाटील, विजय कलापुरे, रुपेश पाटील, एकनाथ धांडे, किशोर पाटील, वैभव गुंजाळ, सुमित देसले, सचिन पाटील, ज्ञानेश्वर जगदाळे, ॲड. निलेश भंडारे, पवन पाटील, उत्कर्ष भंडारी व इतर समाज बांधव उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!