आजच्या ११ सायकलींसह चोराची ३५ चोऱ्यांची कबुली

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागातून सायकली चोरून कमी भावात विक्री करणाऱ्या संशयित आरोपीला शहर पोलीसांनी काल बुधवारी सकाळी ८ वाजता शास्त्री टॉवर चौक येथून २४ चोरीच्या सायकलींसह अटक केली होती. त्याची कसून चौकशी केली तर त्याने अजून ११ चोरीच्या सायकली काढून दिल्या आहेत. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश दौलत साबळे (वय-४२) रा. खडका रोड, भुसावळ असे संशयित आरोपीचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पो.ना. प्रफुल्ल धांडे, तेजस मराठे आणि राजकुमार चव्हाण हे काल बुधवारी २ जून रोजी सकाळी ८ वाजता पेट्रोलिंग करत असतांना नेहरू पुतळा ते शास्त्री टॉवर चौक दरम्यान असलेल्या कॉटनकिंग दुकानासमोर एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आले. गणेश दौलत साबळे (वय-४२) रा. खडका रोड, भुसावळ असे त्याने त्याचे नाव सांगितले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरीच्या २४ सायकली काढून दिल्यात. त्याच्या खिश्यातून चाव्यांचा गुच्छा आढळून आला आहे. चोरट्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची अजून चौकशी केली असता आज चोरीच्या अजून ११ सायकली सायकली काढून दिल्या आहे. आतापर्यंत एकुण ३५ चोरीच्या सायकली हस्तगत करण्यात आले आहे. संशयित आरोपी गणेश साबळे याला न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी वाढविली आहे.

Protected Content