सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळेच कोरोनाचे संकट — खा शफीकुर्रहमान बर्क

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । संभलचे समाजवादी खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी कोरोना आजार असता तर जगात त्यावर उपाय असता. हे संकट  सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे आलेलं आहे. अल्लाहसमोर रडून माफी मागितल्यास हे संकट संपेल, असं म्हटलं आहे

 

शफीकुर्र रहमान यांनी भाजपा सरकारवर अनेक गंभीर आरोप केलेत. सध्याच्या सरकारने शरीयतमध्ये छेछाड करण्याबरोबरच मुलांना पकडून देत बलात्कार , मॉब लिचिंग आणि इतरही अनेक गुन्हे सरकारने केलेत ज्यामुळे संकट देशात आलं आहे. मात्र या वक्तव्यावरुन वाद झाल्यानंतर शफीकुर्र रहमान यांनी बलात्कारासंदर्भातील आपलं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने प्रसारमाध्यमांनी मांडल्याचा दावा केलाय. शफीकुर्र रहमान यांनी आधी लस टोचून घेण्यासही विरोध केला होता. मात्र आता त्यांनी लसीकरणासाठी होकार दिलाय.

 

संभल लोकसभा मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे खासदारशफीकुर्र रहमान यांनी एस. टी. हसन यांच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन करताना मुस्लिमांच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली. भाजपा सरकारने सात वर्षाच्या कार्यकाळात शरीयत कायद्यामध्ये छेडछाड केल्याने कोरोनाची महासाथ आणि चक्रीवादळांसारखी नैसर्गिक संकटं देशात आल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यांच्या वक्तव्यानंतर शफीकुर्र रहमान यांनी वादात भर टाकणारं मत व्यक्त केलं आहे.

 

कोरोना हा काही आजार नसल्याचं मी मागील वर्षीच म्हटलं होतं. आजार असता तर त्यावर इलाज असता, पण असं कोरोनासंदर्भात नाहीय. अल्लाहसमोर रडत रडत आपल्या चुकींसाठी माफी मागणं हा कोरोनावर मात करण्याचा, त्याला नष्ट करण्याचा एकच मार्ग असल्याचं शफीकुर्र रहमान म्हणालेत. “आम्ही मुस्लिमांना मशीदींमध्ये आणि मदरशांमध्ये नमाज पठणाची परवानगी मागितली होती. मात्र सरकारने आमचं म्हणणं ऐकलं नाही. या चुकींमुळेच आज अनेक संकट येत आहेत,” असंही शफीकुर्र रहमान म्हणाले.

Protected Content