रावेर नगरपरिषदेची प्रभाग रचना जाहीर


रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर नगरपरिषदेची अंतीम प्रभाग रचना आज जाहीर झाली असून २४ जागांसाठी बारा महीला निवडून येणार आहे. त्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या प्रत्येक एक महीला असणार आहे.त्यामुळे यंदाची निवडणूक रंगदार होणार हे मात्र निश्चित आहे. रावेर नगर पालिकेच प्रभाग आरक्षण उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये काढण्यात आले त्यांना मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांनी सहकार्य केले. आरक्षण पुढील प्रमाणे आहे.

प्रभाग क्रमांक एक –  अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण महीला,  प्रभाग क्रमांक दोन –  अ नागरिकांचा मागास प्रवर्ग,  ब सर्वसाधारण महीला,
प्रभाग क्रमांक तीन – अ नागरिकांचा मागास प्रवर्ग,  ब सर्वसाधारण महीला
प्रभाग क्रमांक चार – अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महीला,  ब सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक पाच-  अ अनुसूचित जाती,  ब सर्वसाधारण महीला,  प्रभाग क्रमांक सहा –  अ सर्वसाधारण महीला,  ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक सात
अ सर्वसाधारण महीला,  ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक आठ- अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महीला,  ब सर्वसाधारण,  प्रभाग क्रमांक नऊ –  अ सर्वसाधारण महीला,  ब सर्वसाधारण,  प्रभाग क्रमांक दहा-  अ अनुसूचित जाती महीला,  ब सर्वसाधारण,  प्रभाग क्रमांक अकरा –  अ अनुसूचित जमाती महीला,  ब सर्वसाधारण, प्रभाक क्रमांक बारा-  अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महीला,
ब सर्वसाधारण

माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, दारा मोहम्मद, भास्कर महाजन, शिवसेना उबाठा तालुकाध्यक्ष नितीन महाजन, रविंद्र पवार,अशोक गायकवाड, भावलाल महाजन,यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.