विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकरी आतुर, भुसावळ रेल्वे स्टेशनवर हरिनामाचा गजर

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  “जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा, आनंदे केशवा, भेटताची…” या अभंगाप्रमाणे वारकरी संप्रदाय विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेला असून खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी पंढरपूर यात्रेकरता स्पेशल ट्रेनचे आयोजन करण्यात आले आहे.

भुसावळ रेल्वे स्टेशनवर वारकऱ्यांनी केलेल्या हरिनामाच्या जयघोषाने रेल्वे स्टेशन परिसर दुमदुमून निघाला. रावेर लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे या प्रत्येक वर्षी वारकऱ्यांसाठी भुसावळ येथून पंढरपूरला जाण्याकरता मोफत ट्रेन प्रवासाचे आयोजन करतात.

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे सामान्य नागरिक गावोगावचे वारकरी वारीला, पंढरपूर येथील विठुरायाच्या दर्शनाला मुकले होते. मात्र यंदाच्या आषाढी एकादशीसाठी खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून मोफत ट्रेनचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड वारकरी संप्रदाय आणि भाविक भुसावळ रेल्वे स्टेशनवर दाखल झाले असून भजन, फुगडी आणि हरिनामाच्या जयघोषानं रेल्वे स्टेशन परिसर दुमदुमून निघाला आहे

Protected Content