आ. सावकरेंना शिवसेनेकडून मिळतेय मदत (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 10 15 at 9.35.48 PM

भुसावळ, प्रतिनिधी | मातोश्रीचा आदेश आल्यानंतर खरा शिवसैनिक कामाला लागतो तोच खरा शिवसैनिक आहे. शिवसेनेचाच नव्हे तर सर्वच पक्षांनी पक्षाचा आदेश आल्यानंतर महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार करण्याची गरज असल्याचे मत महायुतीचे उमेदवार आ. संजय सावकारे यांनी व्यक्त केले आहे. ते प्रचार कार्यालयात मंगळवारी शिवसैनिकांच्या बैठकीत बोलत होते.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आ. दिलीप भोळे होते. तर बैठकीस शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीळकंठ फालक, जिल्हा उपप्रमुख अॅड. श्रीशाम गोंदेकर, शहर प्रमुख बबलू बराटे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, नमा शर्मा, अॅड. निर्मल दायमा, प्रा. धीरज पाटील, शरद जयस्वाल, माजी नगरसेवक तथा तालुका उपप्रमुख पप्पू बारसे, गोकुळ बाविस्कर, हेमंत खंबायत, निलेश मराठे, प्रा. विनोद गायकवाड, धनराज ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भोळे, सुरेश पाटील, राकेश खरारे, पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर वाणी, गोलू कापडे आदी उपस्थित होते.लोकशाहीमध्ये उमेदवारी मागणे चुकीचे नाही. मात्र उमेदवार घोषित झाल्यानंतर महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचा एकदिलाने काम करावे असे आवाहन आ. सावकारे यांनी केले. ना. गुलाबराव पाटील यांच्याबाबत मलाही आदर आहे असे त्यांनी सांगितले.

बाळासाहेबांचा शिवसैनिक केवळ प्रेमाचा भुकेला – गुंजाळ

शिवसैनिक हा केवळ प्रेमाचा भुकेला आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरही शिवसैनिकांना मानाचे स्थान मिळावे अशी अपेक्षा नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी व्यक्त केली आहे. यावेळी जिल्हा उपप्रमुख ॲड. श्रीगोंदेकर, माजी तालुकाप्रमुख निळकंठ फालक, प्रा. धीरज पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक देवेंद्र पाटील यांनी केले .

Protected Content