विषय कायमचा संपवायचाय – राज ठाकरेंचं मनसे सैनिकांना पत्र

लोक सहभागातून आंदोलन यशस्वी करण्याचा मानस

मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसंस्था | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंगा हा विषय कायमचा संपवायचा आहे असं म्हणत एका पत्राद्वारे आपला मुद्दा पुन्हा एकदा पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांनी हे पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत लिहून प्रत्येक पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलं आहे. पत्रात भोंग्याचा विषय कायमचा संपवायचा असल्याचे म्हणत त्यानी भोंग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी मनसे सैनिकांना प्रत्येक घराघरात जाऊन हे पत्र पोहचविण्याचं आवाहन केलं आहे.

व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही, असेही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलेय.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!