मतदान साहित्यासह कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना

WhatsApp Image 2019 04 22 at 11.59.53 AM

जळगाव (प्रतिनिधी )  रावेर, जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी उद्या २३ रोजी  मतदान होणार आहे. यासाठी सर्व कर्मचारी ,अधिकारी हे ईव्हीएम मशीन, व्हीव्ही पॅड सह पोलीस बंदोबस्त रवाना झाले आहे. शासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झाली असून मतदार व कर्मचाऱ्यांनी केंद्रांवर मोबाईलचा वापर करू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या दोन्ही लोकसभा मतदारसंघात मुख्यतः लढत भाजपा महायुती व  कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी यात होणार आहे.

 

१७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात मुख्यतः भाजपच्या रक्षा खडसे,  कॉग्रेसचे डॉ. उल्हास पाटील व जळगावमध्ये भाजपचे आ. उन्मेष पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्यात लढत होणार आहे.  या दोन्ही लोकसभेसाठी आज सकाळी ७ वाजता मतदानास प्रारंभ होणार आहे.  जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील ३६१७ मतदार केंद्रांवर सकाळी सात वाजेपासून मतदानास प्रारंभ होणार आहे. यासाठी २२ रोजी सकाळी आठ वाजेपासून मतदान यंत्र व इतर साहित्य कर्मचाऱ्याना वितरित करण्यात आले. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी एकलव्य क्रीडा संकुलाच्या प्रांगणात साहित्य वितरित झाल्यावर उपस्थित कर्मचाऱ्यानी यंत्रांची तपासणी केली. त्याच्या शंकांचे निरसन झाल्यानंतर  कर्मचारी, पोलिसांसह बसेस् व इतर वाहनांनी मतदान केंद्रांकडे रवाना झाले. तर जळगाव ग्रामीण मतदार संघासाठी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथून कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटप करण्यात आले.

Add Comment

Protected Content