गोलाणी मार्केटमध्ये अचानक आग

aag 1 1

जळगाव (प्रतिनिधी)  गोलाणी मार्केटमध्ये आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास चौथ्या मजल्यावरील ‘सी’वींगमध्ये वापरात नसलेल्या हॉलमध्ये अचानक आग लागली. अग्नीशमन बंबाच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणली.

 

गोलाणी मार्केटमध्ये  आग लागल्याची वार्ता पसरताच बघ्यांची गर्दी जमा झाली होती . चौथ्या मजल्यामधून धुराचे लोट बाहेर पडत होते. सुरुवातीस बादलीच्या   सहाय्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. परंतु, आग आटोक्यात येत नसल्याने अग्नीशमन दलास बोलविण्यात आले. यावेळी अग्नीशमन बंबाचे कर्मचार्‍यांनी तातडीने गोलाणी मार्केटमध्ये पाईप थेट चौथ्या मजल्यावर आणले. दरम्यान, ५  ते १०  मिनीटात आग नियंत्रणात आणली. यावेळी अग्नीशामन बंबाचे अधिकारी अतिजीत बरडे,  शशिकांत बारी, संतोष पाटील, सोपान जाधव, सोपान कोळी आदी कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेटू देवून आग विझवली.

कचरा पेटल्याने आग 

चौथ्या मजल्यावरील सी विंगमध्ये जेथे आग लागली. तेथे मोठा वापरात नसलेला हॉल असून प्र्रचंड कचरा व मद्याच्या बाटल्या असल्याने कोणीतरी आग लावून दिली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कचरा मोठा असल्याने आगीचे लोट खिडक्यांमधून बाहेर येत होते.

 

Add Comment

Protected Content