ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार: एक जखमी

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कामाच्या शोधासाठी जळगावात आलेले मुकेश उदलसिंग चव्हाण (रा. खारी, जि. बऱ्हाणपूर) हे दुचाकीवर जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने ते जागीच ठार झाले तर त्यांचा पुतण्या तुषार रमेश पवार (१८, रा. कुसुंबा) हा जखमी झाला.

हा अपघात शनिवार, १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता काशिनाथ चौक ते अजिंठा चौफुलीदरम्यान झाला. या प्रकरणी रविवारी १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबबात अधिक असे की, मुकेश चव्हाण हे जळगाव येथे कामाच्या शोधासाठी आले होते. यासाठी ते कुसुंबा येथे त्यांचे मामे भाऊ रमेश पवार यांच्या घरी राहत होते. शनिवारी १६ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते तुषार पवारसह दुचाकीने जळगावकडेस येत असताना भरधाव ट्रकने (क्र. एमएच १५, सीके २२३०) धडक दिली. यात चव्हाण जागीच ठार झाले. या अपघातात दुचाकीचालक तुषार पवार यालाही मार लागला आहे. या प्रकरणी तुषार पवार याने रविवारी १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहेत.

Protected Content