गावठी हातभट्टी दारू विक्रेत्यांवर कारवाई; शहर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परीसरात दोन ठिकाणी तर  शिवाजी नगर रेल्वे उड्डाण पुलाजवळ असे वेगवेगळ्याी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत शहर पोलिसांनी ६० लिटर गावठी हातभट्टीची दारु नष्ट करण्यात आली. ही कारवाई रविवार, १७ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ वाजेच्या दरम्यान करण्यात आली. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेंदालाल मिल परिसर आणि छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाण पुलाजवळ गावठी हातभट्टीची दारु विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरून शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तेथे पोहचले.  पहिल्या कारवाईत  मंगला प्रकाश बाविस्कर (रा. गेंदालाल मिल परिसर) ही महिला अवैधरित्या दारु विक्री करत असल्याचे आढळून आली. तिच्याकडून एक हजार रुपये किमतीची २० लिटर गावठी हातभट्टीची दारु नष्ट करण्यात आली.  दुसरी कारवाई शिवाजीनगर उड्डाणपुलाखाली करण्यात आली. तेथे मुस्तफा सलीम खाटीक (२८, रा. गेंदालाल मिल परिसर) हा गावठी दारु विक्री करत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून एक हजार रुपये किमतीची २० लिटर गावठी  दारु जप्त करून नष्ट करण्यात आली.  गेंदालाल परिसरातच संजय गोविंदा सोनवणे (३५, रा. गेंदालाल मिल) हा गावठी दारु विक्री करत असताना आढळून आल्याने त्याच्याकडून १ हजार रुपये किमतीची २० लिटर गावठी दारु जप्त करुन नष्ट करण्यात आली. या प्रकरणी तिंघाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content