अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बोरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहून नेणारे ट्रॅक्टर हे महसूल खात्याच्या पथकाने पकडल्याची कामगिरी बजावली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील बोहरे येथील बोरी नदी पात्रातून मोठ्या  प्रमाणात म्हणजे कमीत कमी १०० ते २०० ब्रास वाळू उत्खनन करून सर्व नदीत खड्डेच खड्डे झाल्याची तक्रार महसूल प्रकास नाला मिळाली होती. त्याची तात्काळ दखल घेत महसूल प्रशासनाने  रस्ता खोदून  वाळु वाहतुक मार्ग बंद केला. परंतू एका दिवसात वाळु माफियांनी प्रशासनाचा कणभरही धाक न बाळगता रस्ता पुन्हा सुरू करून वाळु वाहतूक सुरु केली.

वाळु माफिया संघटित प्रकारे गुन्हा करित असुन कर्मचारी व  प्रशासनावर राजकिय दबाव व अवैध संपत्तीच्या जोरावर दबावतंत्र वापरतात. परंतु यावेळी महसूल प्रशासनाने कडक कार्यवाहीचे पाऊल उचलायचे ठरवले व संपुर्ण नदि पात्राचा पंचनामा करून मोठा  दंड वसुल करण्याचे ठरवले. यानुसार पथक रस्त्यावर उतरले. परंतु बोहरे ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी  वाळु माफ्यिांना शेवटची संधी द्या व फक्त वाहन जप्तीची कार्यवाही करण्याची विनंती केली.

यावरून महसूल पथकातील नगावचे मंडल अधिकारी विठल पाटील, अमळनेरचे तलाठी आबाजी बी. सोनवणे; टाकरखेडा येथील मंडल अधिकारी गौरव शीरसाठ, मारवडचे तलाठी एम. पी.भावसार, मुडी येथील तलाठी प्रदिप भदाणे, बामणे येथील तलाठी सचिन बमनाथ आणि तलाठी निलेश पवार यांच्या महसुल पथकाने वाळु माफिया मुकादमाचे वाळू ट्रॅकटर बोहरे ते पाडळसरे अवघड रस्त्यातून पाठलाग करून मोठ्या जिकरिने पकडून मारवड पो.स्टेशन ला जमा केले.

Protected Content