श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानातर्फे २१ दिवसीय श्रीमद भागवत कथा महोत्सव

WhatsApp Image 2019 11 30 at 15.36.45

जळगाव, प्रतिनिधी | श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानतर्फे यावर्षी प्रथमच २१ दिवसीय श्रीमद भागवत कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कथेचे निरूपण स्वामी श्री श्रवणानंदजी सरस्वती महाराज हे करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

जळगाव शहरात व जिल्ह्यात सर्व भागातील जनतेस श्रीमद भागवत कथा महोत्सवरूपी ज्ञानगंगा लाभ मिळावा, ह्या महान उद्देशानेच आयोजन शहरातील प.पू.डोंगरेजी महाराज नगर, सागर पार्क मैदानावर दि.२ ते २२ डिसेंबरपर्यंत करण्यात आले आहे.समुद्र मंथनाची आरास असलेले भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून ४ हजार फुटाचे भव्य व्यासपीठ असल्याने सभा मंडपाच्या कोणत्याही कोपऱ्यातून सहज लक्ष वेधले जाणार आहे. भक्ताना बसण्यसाठी अंदाजे सुमारे एक लाख फुटाचा डोम पद्धतीने भव्य मंडप तयार करण्यात आला आहे. मंडपात स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. भक्तांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. कथा निरूपण दोन सत्रात होणार आहे. सकाळचे सत्र ९ ते १२ पर्यंत राहणार असून दुसरे सत्र ३ ते ६ पर्यंत राहणार आहे. एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण सभा मंडपात ८५१२ फुटाच्या दोन डिजीटल एलईडी स्क्रीन बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही भाविकाला कुठूनही थेट व्यासपीठ व स्वामीजी दिसणार असून कथेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. श्रीमद भागवत कथा महोत्सव दरम्यान आयोजक व सामाजिक संस्थेमार्फत भाविकांसाठी दररोज दुपारी मोफत महाप्रसादाची (भंडारा) व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच सवलतीच्या दरात म्हणजे उसाचा रस ७ रुपये ग्लास, १० रुपयात ४ इडली इत्यादी देखील उपलब्ध असणार आहे.  श्रीमद भागवत कथा महोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षीततेसाठी आयोजक पूर्ण दक्षता बाळगणार आहेत. त्यासाठी कार्यक्रमस्थळाजवळ पोलीस चौकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच जनरेटर, प्रसाधनगृहाची व्यवस्था राहणार आहे. तरी सर्वांनी आवर्जुन श्रीमद भागवत कथा महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content