पहूरपेठ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान; १८ जागेसाठी ५९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

पहूर-रविंद्र लाठे । जामनेर तालुक्यातील पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक रविवारी ५ नोव्हेंबर रोजी होत असून यात लोकनियुक्त सरपंचासह एकूण १८ जागेसाठी दोन अपक्षांसह ५९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले भाग्य आजमावत आहे.

जामनेर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नावारूपास आलेल्या पहूर पेठ ग्रामपंचायतचे पंचवार्षिक निवडणूक सन  २०२३ ते २०२८ येत्या ५ नोव्हेंबर रोजी होत असून प्रथमच तिरंगी लढत होत आहे. सरपंचपदासाठी अनुसूचित जाती जमाती च्या उमेदवारास राखीव जागा असल्याने या जागेसाठी तीन उमेदवार आहेत निवडणुकीत भाजपा प्रणित लोकशाही ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व मंत्री गिरीश भाऊ महाजन व माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे यांच्या नेतृत्वात लढविण्यात येत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा हे करीत आहे तर गाव बचाव पॅनलच्या माध्यमातून आरोग्य दूध प्रफुल्ल रायचंद लोढा यांच्या नेतृत्वात लढविल्या जात आहे.

दोन माजी सभापती यांच्यात टक्कर

२५ वर्षे पहूर पेठ गावाची धुरा सांभाळणारे माजी जि.प. कृषी सभापती प्रदीप लोढा व माजी पंचायत समिती सभापती व माजी जि प सदस्य राजधर पांढरे यांच्यात प्रभाग क्रमांक एक मध्ये काट्याची लढत होत असून संपूर्ण जामनेर तालुक्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. यात कोण भाजी मारणार हे तर येणारा काळ ठरविणार आहे.

Protected Content