वरणगावात मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| वरणगावातील तिरंगा चौकामध्ये मनोज जरांगे  पाटलांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मनोज जरांगे पाटील हे सध्या खानदेशाच्या दौऱ्यावरती आहेत भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे आज रोजी त्यांनी भेट दिली यावेळी वरणगावातील तिरंगा चौकामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे मराठा बांधवांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे मनोज जरांगे पाटील यांचे जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत करण्यात आले, यावेळी त्यांनी राज्य शासनावर जोरदार हल्लाबोल केला.

Protected Content