मोदी सरकारने सूडाचे राजकारण सोडून देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढावे : मनमोहन सिंह

1557976596 manmohan singh

 

नवी दिल्ली (प्रतिनिधी) माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देशाच्या जीडीपी दरात झालेल्या घसरणीबद्दल मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भारतातल्या आर्थिक क्षेत्रात आलेल्या मरगळीसाठी त्यांनी मोदी सरकारला जबाबदार ठरवले आहे. ही आर्थिक मंदी मानवनिर्मित असून ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झाली आहे.त्यामुळे मोदी सरकारने सूडाचे राजकारण सोडून देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढावे, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले.

 

मागील तिमाहीत जीडीपी 5 टक्के होता. यातून असे दिसून येत की देश मोठ्या आर्थिक मंदीतून जात आहे. वेगाने विकास करण्याची क्षमता भारताकडे आहे. मात्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. उत्पादन क्षेत्रातील वाढ थेट 0.6 टक्क्यांनी घसरल्यामुळे स्थिती चिंताजनक आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे ढासळलेली अर्थव्यवस्था सावरली नसल्याचे यातून स्पष्ट होत, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले. भारतात झपाट्याने विकास करण्याची क्षमता आहे. आपला देश सातत्याने अर्थव्यवस्थेच्या स्लोडाउनचा धोका पत्करू शकत नाही. यासाठी मी सरकारला आवाहन करतो की त्यांनी सूडाचे राजकारण सोडावे आणि देशाला या संकटातून बाहेर कसे काढता येईल या दिशेने पावले उचलावी,असे देखील मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

Protected Content