मनमोहन सिंग अमृतसरमधून निवडणूक लढण्याची शक्यता

अमृतसर (वृत्तसंस्था) पंजाबमधील अमृतसर लोकसभा मतदारसंघातून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कॉंग्रेस रिंगणात उतरविण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. दरम्यान,मनमोहन सिंग हे अमृतसरमधून लढण्यास तयार झाल्यास त्यांच्या विरोधात भाजप कोणाला उमेदवारी देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड व प्रभारी आशा कुमार या तिघांनीही मनमोहन यांना अमृतसरमधून निवडणूक लढविण्याची गळ घातली आहे. मनमोहन यांनी अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. मात्र, पक्ष त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार करत आहे. मागील निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी अमृतसरमधून निवडणूक लढवली होती. मात्र, काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यावेळी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी जेटली यांना विजय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेसचे नेतेही त्याच पद्धतीने मनमोहन सिंग यांची मनधरणी करत असल्याचे समजते.

Add Comment

Protected Content